समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण

व्यस्तप्रमाण

views

3:52
व्यस्तप्रमाण (Inverse Proportion) : आता आपण व्यस्तप्रमाण म्हणजे काय ते काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया. यावरून आपल्या असे लक्षात येते की स्वयंसेवकांची संख्या कमी झाली की लागणारे दिवस वाढतात आणि स्वयंसेवकांची संख्या वाढली की कामाचे दिवस कमी होतात. म्हणून स्वयंसेवक व कामाचे दिवस यामध्ये व्यस्तप्रमाण आहे असे आपण म्हणू शकतो. एक राशी वाढली असता तिच्याशी संबंधित दुसरी राशी ठरावीक प्रमाणात कमी होते अथवा पहिली राशी कमी झाली असता तिच्याशी संबंधित दुसरी राशी ठरावीक प्रमाणात वाढते, तेव्हा त्या दोन राशींमध्ये व्यस्तप्रमाण आहे असे म्हणतात. मुलांनो, आता आपण काही व्यस्तप्रमाणाची उदाहरणे पाहूया म्हणजे तुम्हांला नीट समजेल.