समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण

व्यस्तप्रमाण उदाहरणे

views

5:13
व्यस्तप्रमाण उदाहरणे: उदा: एका शाळेतील 7 वी चे विद्यार्थी सहलीसाठी एका शेतमळयामध्ये बसने गेले. त्यावेळचे त्यांचे काही अनुभव पाहू. प्रत्येक अनुभवातील संख्या समप्रमाणात आहे की व्यस्तप्रमाणात आहे ते ओळखायचे आहे. *सहलीसाठी प्रत्येक मुलाकडून खर्चासाठी 60 रुपये घेतले. एकूण 45 विदयार्थी होते म्हणून किती रुपये जमले? पाहा, या उदाहरणात विदयार्थ्यांची संख्या आणि प्रत्येक मुलाकडून काढण्यात आलेले पैसे या दोन्ही गोष्टी दिल्या आहेत. म्हणून या दोघांचा गुणाकार करू. म्हणून, विदयार्थ्यांची संख्या × प्रत्येक विदयार्थ्यांकडून काढण्यात आलेले पैसे = 45 x 60 = 2700 रुपये. म्हणून एकूण 45 विदयार्थ्यांचे 2700 रुपये जमा झाले. तर मग आता 50 विदयार्थ्यांचे किती रुपये जमा झाले असतील ते काढू. प्रत्यके मुलांकडून खर्चासाठी घेतलेले 60 रुपये x 50 विदयार्थ्यांकडून काढण्यात आलेले पैसे = 60 x 50 = 3000 रु. म्हणून 50 विदयार्थ्यांचे 3000 रुपये जमा झाले असतील.