हवेचा दाब

तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाबपट्टे यांचा परस्परांशी संबध

views

3:17
तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाबपट्टे यांचा परस्परांशी संबध असतो. तापमानाचे पट्टे म्हणजे पृथ्वीवरील अक्षवृत्तीय दृष्ट्या असणारे तापमान व त्यांचे वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये केलेले विभाजन असते. उत्तर व दक्षिण गोलार्धातील 00 ते 23030’ (23 अंश 30 मिनिटे) या अक्षवृतांच्या भागातील पट्ट्याला उष्ण कटिबंध म्हणतात. तर 23030’ ते 66030’ उत्तर व दक्षिण या अक्षवृतांच्या भागातील पट्ट्याला समशीतोष्ण कटिबंध म्हणतात. आणि 66030’ ते 900 उत्तर व दक्षिण या अक्षवृतांच्या भागातील पट्ट्याला शीत कटिबंध म्हणतात. तापमानाच्या पट्ट्यांप्रमाणे हवेच्या दाबाचे पट्टे ही आपल्याला आकृतीत दिसत आहेत.या दोन्हींचा परस्परांशी संबंध असतो. परंतु तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो. उष्ण कटिबंध हा तापमानाचा पटटा आहे. उष्ण कटिबंधात 23०30’ उत्तरेपासून ते 23०30’ दक्षिणेपर्यंतच्या प्रदेशांचा समावेश होतो. म्हणजे उष्ण – कटिबंधात जास्त अक्षवृत्ते समाविष्ट असतात. विषुववृत्तापासून सुमारे 23० 30’ उत्तर आणि 23० 30’ दक्षिण म्हणजे साधारण 47 अक्षवृत्ते इतका हा विस्तार झाला. याउलट मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा हा 25० उत्तर ते 35० उत्तर इतका व 25० दक्षिण ते 35० दक्षिण म्हणजे उत्तरेस 10० इतका व दक्षिणेस 10० इतका हवेचा दाब पटटा आहे. म्हणजे दाब पटटयाचा विस्तार सर्वसाधारणपणे 10० अक्षवृत्ते इतकाच असतो.