मसावी लसावी

तीन संख्यांचा मसावि काढणे

views

4:43
तीन संख्यांचा मसावि काढणे : मुलांनो, आता आपण तीन संख्यांचा मसावि कसा काढतात ते पाहू उदा : 35 ,15 आणि 25 यांचा मसावि काढा. 35 = 7 X 5 15 = 3 X 5 आणि 25 = 5 X 5. या सर्व संख्यांचे अवयव लिहिले असता त्यामध्ये 5 हा एकच सामाईक विभाजक आहे. म्हणून 35, 15, 25 चा मसावि 5 आहे. उदाहरण : 195, 312 व 546 यांचा मसावि काढा. अशा संख्या मोठ्या पाढ्यांत शोधणं थोडसं कठीण असतं, म्हणून दिलेल्या संख्या कोणत्या संख्येने विभाज्य आहेत ते शोधू. 195च्या एककस्थानी 5 हा अंक आहे म्हणजे 195 ही संख्या 5 ने विभाज्य असू शकते. 312 च्या एककस्थानी 2 हा अंक आहे म्हणजे ती संख्या 2 ने विभाज्य आहे. 546 संख्या सुद्धा 2ने विभाज्य आहे. 195 चे अवयव आहेत : 5 X3 X 13 312 चे अवयव आहेत: 2 X 2 X 2 X 3 X 13 आणि 546 चे अवयव आहेत: 2 X 3 X 7 X 13 पहा, या तिन्ही संख्यांचे 3 व 13 हे दोन सामाईक अवयव आहेत, म्हणून त्यांचा गुणाकार करूया 13 X 3 = 39 म्हणून 195 , 312, आणि 546 चा मसावि 39 आहे.