मसावी लसावी

मसावि व लसावि मूळ अवयव पद्धत

views

3:46
मुलांनो, आता पर्यंत आपण मसावि व लसावि मूळ अवयव पद्धतीने कसा काढायचा ते पाहिले. आता आपण 18 व 30 या संख्यांचा लसावि व मसावि काढू. आणि त्यांचा गुणाकार व दिलेल्या संख्यांचा गुणाकार यांची तुलना करू. यासाठी प्रथम दोघांचे अवयव काढू. यातील सामाईक अवयव 2 व 3 आहे. म्हणून यांचा मसावि हा सामाईक अवयवांचा गुणाकार आहे. म्हणून मसावि = 2 x 3 = 6 यांचा लसावि हा सामाईक व असामाईक अवयवांचा गुणाकार आहे. लसावि = मसावि × असामाईक अवयवांचा गुणाकार. येथे असामाईक अवयव 3 × 5. म्हणून लसावि =2 x 3 x 3 x 5= 90 मसावि x लसावि = 6 x 90 = 540 आता दिलेल्या संख्यांचा गुणाकार करून बघूया. 18 x 30 = 540 यावरून आपल्या असे लक्षात येते की दोन संख्यांचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या लसावि व मसावि यांच्या गुणाकाराएवढा असतो.