वृष्टी

पाऊस

views

3:36
पृथ्वीवर पाणी मुख्यत: पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंचावर गेल्यावर या हवेचे तापमान त्या ठिकाणच्या कमी तापमानामुळे कमी होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे जलकणात रुपांतर होते म्हणजेच बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुळीचे कण एकत्र येऊन ढग तयार होतात. ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण वजनाने जड असतात. ते हवेत तरंगू शकत नाहीत. त्यामुळे जलकणांची पावसाच्या स्वरुपात वृष्टी होते. पावसाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. 1) आरोह किंवा अभिसरण पाऊस 2) प्रतिरोध पाऊस आणि 3) आवर्त पाऊस: