वृष्टी

धुके, दव आणि दहिवर

views

2:09
आतापर्यंत आपण वृष्टीची हिम, गारा व पाऊस ही प्रमुख रूपे पाहिली. आता आपण वृष्टीची इतर रूपे म्हणजे धुके, दव, आणि दहिवर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन म्हणजेच संप्लवन जेव्हा भूपृष्ठालगत होते, तेव्हा धुके, दव आणि दहिवर पाहायला मिळते. धुके : ज्यावेळी भूपृष्ठालगतच्या हवेच्या थरांचे तापमान कमी होते, अशावेळी तापमान कमी झाल्यामुळे भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. म्हणजेच बाष्पाचे सूक्ष्म जलकणांत रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यावर धुके तयार होते. दव :- भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूंशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. आणि बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटतात. यालाच दवबिंदू म्हणतात. दहिवर :- ज्या प्रदेशांतील तापमान 0० से पेक्षा कमी असते अशा प्रदेशात वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूना दहिवर असे म्हणतात. हिवाळयात दव व दहिवराची निर्मिती मोठया प्रमाणावर होते. दहिवर जम्मू काश्मीर सारख्या कमी तापमान असलेल्या प्रदेशात पाहायला मिळते.