वृष्टी

वृष्टीचे परिणाम

views

4:27
पृथ्वीला जे पाणी मिळते त्याचा मुख्य स्तोत्र वृष्टी आहे. वृष्टीच्या विविध रूपातूनच पृथ्वीला पाणी पुरवठा होत असतो. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे, तशीच कमी वृष्टीदेखील हानिकारक असते. अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर येतात. त्यालाच ओला दुष्काळ म्हणतात. महापुरामुळे जीवित व वित्तहानी मोठया प्रमाणात होते. पाऊस पडला नाही, तर अवर्षण म्हणजेच कोरडा दुष्काळ पडतो. त्यावेळी लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. जनावरांना पाणी, चारा मिळत नाही. शेतीसाठी पाणी नसल्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अन्नधान्य इतर देशांकडून आयात करावे लागते. भारतासारख्या कृषीप्रधान देशात अशा दुष्काळामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची होते. कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते. भारतातील शेती, मोठया प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून आहे त्यामुळे आपल्याकडे होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरतो. योग्यवेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो. तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो