आपणच सोडवू आपले प्रश्न

समस्या निवारण

views

5:07
समाजातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न कसा करता येईल?. रस्त्यावर फिरताना आपल्याला वाहतुकीची समस्या जाणवते. ही समस्या दूर करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. रस्त्यानी चालताना डाव्या बाजूने चालायला हवे. आपण रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग पाहतो. हे कचऱ्याचे ढीग वाढतच आहेत. त्यासाठी आपण रस्त्याच्या बाजूला कचरा टाकायचे बंद केले पाहिजे. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून त्या कचऱ्यापासून खताची निर्मिती करता येते. असे विविध प्रकल्प राबविण्याचे प्रयत्न आपण जिथे राहतो, त्या परिसरात केले पाहिजेत.पाणी टंचाईचे मुख्य कारण म्हणजे वृक्षतोड त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच जे उपलब्ध पाणी आहे त्याचा आपण योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. शेतीसाठी जर आपल्याला पाण्याचा उपयोग करायचा असेल तर ‘ठिबकसिंचन’, ‘तुषारसिंचन’ यांचा वापर करायला पाहिजे. म्हणजेच पिकांना जेवढी पाण्याची आवश्यकता असते, तेवढेच पाणी आपण शेतीला देऊन पाणी वाचवू शकतो. तसेच जिथे मोकळ्या जागा आहेत त्याठिकाणी आपण झाडे लावायला पाहिजे. डोंगर माथ्यावर पडलेले पाणी तसेच वाहून जाते. त्यामुळे आपण डोंगराच्या पायथ्याशी, पाणी थोपवून ठेवण्यासाठी दगड, माती यांची थोप टाकायला पाहिजे. थोप म्हणजेच पाणी साठविण्यासाठी उंचवटा केलेला भाग. तसेच पाणी जमिनीमध्ये मुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जर पाणी जमिनीत मुरले तर मुरलेले पाणी कूपनलिका, विहिरी, याद्वारे आपण परत वापरात आणू शकतो. हे झाले आपल्या पातळीवरील समस्या निवारण्याचे उपाय.