आपणच सोडवू आपले प्रश्न

सांगा पाहू: शांततेचे महत्त्व

views

4:07
आप-आपसांमध्ये भांडणे होतात म्हणून मुले शाळेत गोंधळ करतात. शाळेच्या मैदानावरही मुले गोंधळ करतात. ही भांडणे मिटविण्यासाठी आपल्या शाळेमध्ये शांततादूतांचा एक गट असावा. हे गट तयार करण्यासाठी प्रत्येक वर्गातून मतदान घ्यावे. प्रत्येक वर्गातून दोन मुले आणि दोन मुली निवडाव्यात. या शांततादूतांची निवड ज्यांच्यातून कराल ती मुले नियमित शाळेत येणारी असावीत. शिक्षकांसोबत आणि इतर मुलांसोबत त्यांची वर्तणूक चांगली असावी. सगळ्यांना समजून घेणारी असावीत. विशेष म्हणजे ही मुले स्वतः शांत स्वभावाची असावीत. जर मुलां-मुलांमध्ये भांडणे झाली तर शांततादूत दोन्ही मुलांची बाजू समजून घेतात. त्यानंतर दोघांनाही व्यवस्थित समजावून सांगतात. आणि जर भांडणे मिटत नसतील तर शिक्षकांना सांगून ती भांडणे मिटवण्याचा प्रयत्न करतात. समाजातील तंटा मिटवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीस सुरक्षितता मिळाली पाहिजे. त्यांचे शोषण थांबले पाहिजे. समाजातील विषमता कमी झाली पाहिजे. सार्वजनिक जीवनामध्ये सगळ्यांचा हातभार असायला पाहिजे. सार्वजनिक कार्यात सर्वांना सहभागी होता आले पाहिजे. त्यांना संधी मिळाली पाहिजे. शांततेचे महत्त्व सर्वांनी समजून घेतले पाहिजे. शांततेच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. आपल्या कुटुंबात शाळेत, गावात, आजूबाजूच्या परिसरात तसेच संपूर्ण जगात शांतता नांदावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्याचा फायदा सर्वांनाच होतो.शांततेमुळे व्यापार, उद्योग, शिक्षण, कला, साहित्य, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याची व भरभराट करण्याची संधी आपल्याला मिळते. शांतता ही केवळ एक किंवा दोघांची गरज नाही तर ती आपल्या सर्वांची गरज आहे. त्यामुळेच शांतता ही वैयक्तिक गरज न राहता ते एक सामाजिक मूल्य बनते. त्यामुळे आपल्या परिसरात स्वच्छतेबरोबरच, शांततेचे खूप मोलाचे व महत्त्वाचे स्थान आहे.