अन्न टिकवण्याच्या पद्धती

सांगा पाहू !

views

3:21
काही प्रश्नांची उत्तरे पाहू. जेव्हा पदार्थाला घाण वास येतो किंवा पदार्थावर कापसासारखी बुरशी येते, तेव्हा पदार्थ खराब झाला असे म्हणतात. वेगवेगळ्या ऋतूंत अन्नपदार्थ खराब होण्यासाठी लागणारा वेळ वेगळा असतो. उदा. दूध उन्हाळ्यात लवकर खराब होते. तर हिवाळा व पावसाळ्यात बऱ्याच कालावधीपर्यंत दूध टिकते.दूध, भाज्या यांसारखे पदार्थ सर्वात लवकर खराब होतात. पदार्थ जास्त दिवस चांगले राहावेत म्हणून ते स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. दुधासारखे पदार्थ चांगले उकळवून थंड करून फ्रीजमध्ये ठेवावेत. अन्नपदार्थ कोणत्या कारणांनी खराब होतात, हे समजले, तर ते खराब न होण्यासाठी काय करावे हेही आपल्याला समजेल. उदा. धान्याला ओल लागली किंवा धान्य नीट वाळविले नाही की ते खराब होते हे आपणांस समजले की धान्य नीट वाळवून ते पाण्याच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेता येते. • हिवाळ्यात म्हणजेच थंडीच्या दिवसांत अन्नपदार्थ जास्त काळ चांगले राहतात. तसेच पदार्थ फ्रीजमध्ये किंवा बर्फात थंड ठेवले तर ते आणखी जास्त काळापर्यंत टिकतात.• गहू, ज्वारी, तांदूळ यांसारखी धान्ये उन्हात वाळवून साठवतात. त्यामुळे ती वर्षभर चांगल्या प्रकारे राहतात. त्यात किडे, मुंग्या, अळ्या होत नाहीत. तर कांदे, बटाटे उन्हाळ्यात मोकळ्या हवेत ठेवून चांगले वाळवून कोरड्या जागी ठेवले, तर ते खूप दिवस चांगले राहतात.• दूध उकळून ठेवले, तर चांगले राहते. ते नाशिवंत असल्याने त्यात सूक्ष्मजीव तयार होऊन ते खराब होऊ शकते. परंतु दूध उकळल्याने त्यातील सूक्ष्मजीव नष्ट होतात. त्यामुळे दूध उकळल्यानंतर चांगले राहते. जेवण झाल्यानंतर उरलेली आमटी, भाजी पुढच्या जेवणापर्यंत चांगली राहावी म्हणून उकळून ठेवतात.• आमरस, दूध हे लवकर खराब होणारे पदार्थ आहेत.• किडे, मुंग्या, उंदीर, घुशी व मांजरे यांसारखे प्राणी धान्य व इतर अन्नपदार्थ खराब करतात. त्यामुळे त्या प्राण्यांपासून आपले अन्न दूर ठेवावे लागते.