अन्न टिकवण्याच्या पद्धती

करून पहा

views

2:25
याठिकाणी आपण एक प्रयोग करू. या प्रयोगावरून तुमच्या लक्षात येईल की अन्नपदार्थ कसे खराब होतात. यासाठी एका चपातीचे तीन तुकडे घ्या. त्यातील एक तुकडा तसाच काहीही न करता बंद डब्यात ठेवा. दुसरा तुकडा पुन्हा गरम तव्यावर करपू न देता चांगला भाजून थंड करून, डब्यात बंद करून ठेवा. आणि तिसरा तुकडा डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवा. नंतर या तुकड्यांचे दोन ते तीन दिवस सकाळ – संध्याकाळ निरीक्षण करा. मात्र त्या तुकड्यांना हात न लावता फक्त त्यात काय बदल जाणवतो ते पहा.तीन दिवसांनंतर आता आपण चपातीच्या तुकड्यांचे निरीक्षण करू. बघू आपल्याला काय आढळून येते पहा, तसाच डब्यात ठेवलेल्या चपातीच्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे किंवा काळे/हिरवे तंतू वाढू लागले आहेत. या चपातीच्या तुकड्याला वास येऊ लागला आहे. याउलट फ्रिजमध्ये ठेवलेला तसेच पुन्हा भाजून, थंड करून ठेवलेला तुकडा तीन दिवसांनंतरही खराब झालेला नाही. शिवाय त्याला वासही येत नाही.