अन्न टिकवण्याच्या पद्धती

अन्न आणि सूक्ष्मजीव

views

3:51
आपल्या सभोवती हवेत, पाण्यात तसेच सगळीकडे सूक्ष्मजीव असतात हे तुम्हांला माहीत आहे. सर्वसाधारण परिस्थितीत अन्नपदार्थाच्या बरोबर नेहमी ऊब, पाणी आणि हवा या सर्व गोष्टी असतातच. म्हणूनच आपल्या अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ भरभर होणे नेहमीच शक्य असते. आपल्या समोर आपल्या पदार्थात सूक्ष्मजीव असले तरी ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. ते अतिशय लहान असतात. परंतु, हे सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की अन्न खराब होते. असे खराब झालेले अन्न खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. अशा अन्नाचे पोषणमूल्य कमी झालेले असते. काही वेळेला असे अन्न खाल्ल्याने आपल्या शरीराला धोका होऊ शकतो. बऱ्याच घरांमध्ये अन्न वाया कसे घालवायचे म्हणून असे खराब झालेले अन्नही खाल्ले जाते. परंतु असे अन्न खाल्ल्याने त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.