शायिस्ताखानाची फजिती

फिरंगोजी नरसाळा

views

3:06
फिरंगोजी नरसाळा:- पुरंदरचा वेढा उठल्यानंतर शायिस्ताखान पुण्याकडे वळला. त्याने पुण्यापासून १८ किमी पुणे – नाशिक रस्त्यावर असलेला चाकणचा किल्ला घेतला, शायिस्ताखानाला वाटले होते की चाकणचा किल्ला एका हल्ल्यातच आपल्याला मिळेल. पण त्याची निराशा झाली. किल्ल्याचा प्रमुख फिरंगोजी नरसाळा याने पराक्रम गाजविला. दोन महिने शायिस्ताखानाचे सैन्य चाकणच्या किल्ल्याभोवती तळ ठोकून बसले होते. पण मराठे त्यांना दाद देत नव्हते. शायिस्ताखानाचे सैन्य दिवसभर दमून-भागून छावणीत झोपत असत. तेव्हाच रात्रीचे मराठे मावळे फिरंगोजी नरसाळा यांच्यासोबत छावणीत शिरत. झोपलेल्या सैन्याला कापत सुटत. छावणीत सर्वत्र गोंधळ उडे. शायिस्ताखानही दिलदार माणूस होता. त्याने फिरंगोजी व त्याच्या उरलेल्या सैन्याला जिवंत सोडले. अशा प्रकारे फिरंगोजी या मर्दमराठ्याने दोन महिने चाकणचा किल्ला लढवला. लाल महालात शायिस्ताखान :- शायिस्ताखान पुण्यात आला. पुण्यात त्याने शिवाजी महाराजांच्या लाल महालात तळ ठोकला. त्याची फौज लाल महालाभोवती तळ ठोकून होती. त्यामुळे महाराजांच्या मावळ्यांचे काहीच चालेना. त्यांना आपल्या मनाप्रमाणे फिरताही येईना. एक वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हलेना. अशा प्रकारे पुण्याच्या भोवतालचा प्रदेश खान व त्याच्या सैन्याने उध्वस्त करून टाकला. सगळीकडे गोंधळ माजला होता.