शायिस्ताखानाची फजिती

धाडसी बेत

views

2:47
धाडसी बेत : दोन वर्षे झाली तरी खान काही लाल महाल सोडेना. बरे तो फक्त लाल महाल बळकावून बसला असता तर ठीक होते. पण त्याचे सैन्य बाहेर स्वराज्याचे मोठे नुकसान करीत होते. त्यामुळे महाराजांना खानाचा राग आला. त्यांनी त्याची खोड मोडायची ठरविली.त्यामुळे त्या वाड्यातील खोल्या, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा व दालने यांची शिवरायांना सारी माहिती होती. याशिवाय शिवरायांचे हुशार हेर गुपचूप खानाकडील माहिती चोरून काढण्यासाठी खानांच्या सैन्यात व लाल महाल परिसरात वेष बदलून शिरले होते. महाराजांचा बेत अतिशय धाडसी होता. स्वत: शायिस्ताखान जिथे झोपतो, त्या महालात रात्री शिरावे आणि त्याला उडवावे, असा बेत शिवरायांनी आखला होता. शिवरायांनी लाल महालावर हल्ला करण्याचा दिवस निश्चित केला. तारीख ५ एप्रिल १६६३ ची रात्र. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. वरातीत शेकडो लोक नटून – थटून चालले होते. कोणी पालख्यांमध्ये होते, कोणी मेण्यांत बसले होते, तर कोणी पायी चालत निघाले होते. शिवराय वरातीतील लोकांसारखा वेष परिधान करून आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले. वरात लाल महालाला वळसा घालून पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम, शांत झाले. शिवराय व त्यांची माणसे वरातीतून बाहेर पडून लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. त्यावेळी शायिस्ताखान आपल्या महालात गाढ, शांतपणे झोपला होता.