वस्त्र -आपली गरज

करून पहा

views

4:24
करून पहा : मुलांनो, रेल्वे स्टेशन, वीटभट्टीवर काम करणाऱ्या किंवा माळरानावर राहणाऱ्या लोकांची भेट काही विदयार्थी घेत आहेत व त्यांना पुढील प्रश्न विचारत आहेत. त्यांची काय उत्तरे आहेत ते आपण पाहू. सांगा पाहू ! मुलांनो, कपडयांची गरज किती व कशासाठी असते ते आपण पाहिले. मग आता आपण पुन्हा तीच कृती करू जी आपण याआधी केली होती. तर आता तुम्ही पुन्हा या समोरच्या चित्रातील कपडे निवडायचे आहेत. चला तर मग करा सुरुवात. झाले निवडून? पहा, आपण टी.व्ही, वर्तमानपत्रे, रस्त्यांवर लावलेले जाहिरातीचे मोठ – मोठे बोर्ड यांवर अशा कपडयांच्या आकर्षक जाहिराती पाहतो. ते पाहून आपण त्याकडे आकर्षित होतो. आपणही तशाच प्रकारचे कपडे घालावे, आपणही तसे दिसावे, तसे वागावे असे वाटू लागते. त्यामुळे आपणही तसेच कपडे घेण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे वस्तूंबद्दल आपल्या मनात निर्माण होणारे आकर्षण आपल्या हव्यासामध्ये भर घालते. म्हणून आपण ती वस्तू किंवा कपडे घेतो. पण मुलांनो नेहमी कपडे किंवा वस्तू खरेदी करताना हा विचार केला पाहिजे, की खरेच आपल्याला त्या वस्तूची गरज आहे का? त्याला पर्याय म्हणून आपल्याकडे आधीच एखादी वस्तू आहे का? या सर्व गोष्टींचा विचार करूनच नंतर आपण वस्तू खरेदी केली पाहिजे.