वस्त्र -आपली गरज

वैशिष्टयपूर्ण वस्त्रनिर्माण करणारी काही ठिकाणे

views

4:48
वैशिष्टयपूर्ण वस्त्रनिर्माण करणारी काही ठिकाणे: मुलांनो आता आपण महाराष्ट्रात काही वैशिष्टयपूर्ण वस्त्रे निर्माण करणारी ठिकाणे आहेत त्यांची माहिती घेऊ. उदा. पैठणची – पैठणी, येवल्याची – साडी, औरंगाबाद – हिमरू शाली, सोलापूरची – चादर तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमधील हातमाग व यंत्रमागावरील कापड इ. मुलांनो हा नकाशा पहा: या नकाशात ही सर्व ठिकाणे दाखविली आहेत. याव्यतिरिक्त हा वस्त्रोदयोग आपल्या राज्यात अजून दोन ठिकाणी केला जातो. 1. ठाणे जिल्हयातील भिवंडी व 2. नाशिक जिल्हयातील मालेगाव या दोन ठिकाणी यंत्रमाग व हातमागाद्वारे कापड निर्मिती केली जाते. माहीत आहे का तुम्हांला ? (याठिकाणी पुढील साडयांच्या प्रकारानुसार साडया दाखविणे). मुलांनो, आपल्या देशात वस्त्रोदयोग मोठया प्रमाणात चालतो. तसेच देशातील वेगवेगळया भागांतील वेगवेगळया प्रकारच्या साडया प्रसिद्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला साडयांमधील विविधता व देशाची विविधताही दिसून येते. उदा. लखनवी चिकन, काश्मिरची सिल्क, बनारसी सिल्क, कडियल, पितांबरी, पोचंपल्ली, नारायणपेठ, कांजीवरम, पटोला, म्हैसूर सिल्क असे साडयांचे अनेक प्रकार आहेत.