वस्त्र -आपली गरज

करून पहा

views

4:06
मुलांनो, अमितने एक प्रयोग केला आहे. तो काय आहे? ते आपण पाहू. त्याने त्याच्या घरातील आजी – आजोबांना काही प्रश्न विचारले त्यांची उत्तरे घेऊन तो कापड दुकानदाराकडे गेला आहे. त्याचे प्रश्न आपण पाहू. मुलांनो, अमित व दुकानदार यांच्या चर्चेतून आपल्या लक्षात येते, की काळ बदलत जातो, तसतसे वस्त्रांच्या वापरामध्ये बदल होत जातात. वेगवेगळया काळात वेगवेगळया वेशभूषा असलेल्या आपल्याला दिसून येतात. उदा. आदिमानव, प्रगत मानव, वैदिक काळातील मानव, शिवकालीन मानव व आजचा आधुनिक मानव यांची उदाहरणे आपण पाहिली की आपल्याला वेशभूषेत होत गेलेले बदल दिसून येतात. माहीत आहे का तुम्हांला? मुलांनो, आपण आदिमानवाचा इतिहास पाहिला आहे. मानवाच्या उत्क्रांतीवेळी त्याच्या शरीरामध्ये अनेक बदल होत गेले. उदा. चार पायांवर चालणारा मानव दोन पायांवर चालू लागला. मानवाला असलेली शेपूट हळूहळू वापराविना नष्ट झाली. त्यांपैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आदिमानवाच्या शरीरावर प्रचंड केस होते. तो इतर प्राण्यांसारखा केसाळ होता. परंतु हळूहळू त्याच्या शरीरावरील केसांचे प्रमाण कमी होत गेले. ज्या केसांमुळे त्याचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यांसारख्या पासून संरक्षण होत होते, ते केस गेल्यामुळे त्याला ऋतुमानांनुसार शरीराच्या संरक्षणासाठी इतर गोष्टींची आवश्यकता भासू लागली. मानवाच्या वस्त्र वापरण्याच्या पद्धतीत काळानुसार कसे बदल होत गेले ते तुम्हांला या चित्रावरून लक्षात येईल.