महायुदधोत्तर राजकीय घडामोडी

दुसरे महायुदध

views

4:58
१ सप्टेंबर १९३९ रोजी हिटलरने पोलंडवर आक्रमण केले व दुसरे महायुद्ध सुरू झाले. हे १९३९ ते १९४५ या दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. पहिल्या महायुद्धापेक्षा जास्त नुकसान व जीवित हानी या युद्धात झाली. हे युद्ध साधारणपणे सहा वर्षे चालू होते. यात प्रत्यक्ष रणांगणावर सुमारे दीड कोटी सैनिक मारले गेले. इतर ठिकाणी मरण पावलेली माणसे व जखमी, अनाथ, अपंग लोकांची संख्या वेगळी होती. या युद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांचा लष्करी खर्च १५१७ अब्ज डॉलर्स इतका प्रचंड होता. मालमत्तेची हानी याच्या दुप्पट होती. या युद्धात इमारती, सार्वजनिक बांधकामे, घरेदारे, शेती, दवाखाने, कारखाने, धरणे इ.चा मोठया प्रमाणावर विध्वंस झाला होता. यावरून आपल्याला या युद्धाच्या परिणामांची कल्पना येईल. अमेरिका आणि जपान यांच्या या युद्धात झालेल्या प्रवेशामुळे हे महायुद्ध युरोप खंडापुरते मर्यादित न राहता ते पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक व्यापक बनले व त्याला जागतिक स्वरूप प्राप्त झाले. हे युद्ध भूमी, सागर व आकाश अशा तिन्ही ठिकाणी लढले गेले. तसेच या युद्धात पाणबुडी, अणुबॉम्ब यांसारख्या अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. युद्धात सहभागी झालेल्या ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका यांसारख्या मित्र राष्ट्रांचे तर जर्मनी, जपान, इटली यांसारख्या अक्ष राष्ट्रांचे प्रचंड नुकसान झाले. ही राष्ट्रे पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडली. १९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध चालू होते. याच काळात भारतात चले जाव चळवळ, छोडो भारत चळवळ, आझाद हिंद सेनेची स्थापना, प्रतिसरकारे स्थापन करणे या घडामोडी घडत होत्या. इंग्रजांविरुद्धच्या चळवळी जोमाने कार्य करत होत्या