महायुदधोत्तर राजकीय घडामोडी

शस्त्रास्त्र स्पर्धा

views

3:23
शीत युद्धाचा पुढील परिणाम म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धा होय. अमेरिका व रशिया यांची सत्ता प्रभावी शस्त्रांवर आधारलेली होती. महासत्ता एकमेकांना शहकाटशह देण्यासाठी फार मोठया प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करू लागल्या. त्यांनी आपापल्या गटातील राष्ट्रे शस्त्र सज्ज बनविण्यावर भर दिला. भूदल, नौदल वा वायुदल ही लष्कराची तिन्ही दले सुसज्ज बनविण्यात आली. अधिकाधिक विनाश करू शकतील अशी शस्त्रे बनविण्याच्या संदर्भात व त्यास लागणारे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. उदा. लांब पल्ल्याची आधुनिक क्षेपणासत्रे, लढाऊ विमाने व अत्याधुनिक पाणबुड्या यांची मोठया प्रमाणात निर्मिती केली गेली. जग सर्वनाशाच्या उंबरठ्यावर उभे राहिले. शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना झाल्यामुळे शस्त्रास्त्र नियंत्रणाचे आणि नि:शस्त्रीकरणाचे प्रयत्नही याच काळात झाले. नि:शस्त्रीकरण म्हणजे विनाशकारी शस्त्रे, अस्त्रे यांच्या उत्पादनावर बंदी आणणे. तसेच उपलब्ध विनाशकारी शस्त्रे नष्ट करणे होय. यामुळे प्रेरित होऊन अनेक राष्ट्रांनी नि:शस्त्रीकरणास चालना दिली.