स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

जरा विचार करा

views

3:40
२१ मार्च हा दिवस विषुवदिन आणि २१ सप्टेंबर हा शरदसमाप्त दीन म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवशी म्हणजे २१ मार्च व २१ सप्टेंबरला पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र समसमान म्हणजे बारा तासांचे असतात. मुलांनो, ही परिस्थिती दोन्ही ध्रुव सोडून म्हणजेच उत्तर व दक्षिण ध्रुव सोडून पृथ्वीवर इतर ठिकाणी असते. ध्रुवावरती मात्र एका विषुवदिनाला सूर्योदय होतो. तर पुढच्या विषुवदिनाला सूर्यास्त होतो. मुलांनो, या कालावधीत जर तुम्ही ध्रुवावर असाल तर तुम्हाला सूर्य एकाच जागी फिरत असल्यासारखा दिसेल. इतर रेखावृत्ते त्याच्यासमोरून गेल्यानंतर जसे मध्यान्ह, मध्यरात्र समजते तसे समजणार नाही. आणि २१ जून या दिवशी सूर्य उत्तर ध्रुवावर तर २१ डिसेंबर या दिवशी सूर्य दक्षिण ध्रुवावर जास्तीत जास्त उंचावर असेल. सूर्यासमोर रेखावृत्ते येतात, त्यावरून त्या ठिकाणच्या वेळा ठरत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या रेखावृत्तांवर सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त यांच्या वेळा वेगवेगळ्या असतात. सूर्य ज्या दिशेला उगवतो ती पूर्व दिशा होय. आपल्या देशाचा विचार करता देशाच्या अतिपूर्वेकडील प्रदेश म्हणजे अरुणाचल प्रदेश होय. या प्रदेशात सर्वप्रथम सूर्योदय होतो. तर त्याच्या पश्चिमेकडील भागांत थोड्या-थोड्या वेळाने सूर्योदय होतो. उदा: मुंबई हे शहर भारताच्या पश्चिमेकडे आहे. तर भारताच्या पूर्वेला कोलकाता हे शहर आहे. या दोन्ही शहरांचा विचार करता मुंबईत जेव्हा भरदुपारची वेळ असेल तेव्हा कोलकाता येथे ही स्थिती असणार नाही, कारण कोलकाता हे शहर मुंबईच्या पूर्वेकडील रेखावृत्तावर असल्याने तेथे दुपारची वेळ आधीच होऊन गेली असेल.