स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

भारतीय प्रमाणवेळ

views

4:35
आता आपण भारतीय प्रमाण वेळ कशी ठरविली जाते याची माहिती घेणार आहोत. रेखावृत्तीय दृष्ट्या विचार करता भारताचे स्थान हे ग्रीनीच मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. भारताची प्रमाणवेळ उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येधील मिर्झापूर शहरावरून जाणाऱ्या ८२०३०’ (30 मिनिटे) पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते. या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली आहे. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे १२ वाजले असे मानले जाते. ८२०३०’ (मिनिटे) पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक फरक पडत नाही.