आपले भावनिक जग

भावनांचा मेळ कसा घालावा?

views

3:57
भावनांचा मेळ कसा घालावा? – मुलांनो, माणूस हा विचारक्षम असतो, म्हणजेच तो कोणत्याही गोष्टींवर विचार करतो आणि मगच तो आपली प्रतिक्रिया देत असतो. असे असले तरी मानव हा भावनाशीलही आहे. म्हणजेच तो आपल्या मनातील भाव भावना व्यक्त करीत असतो. मुलांनो, आपल्याला आपल्या मनातील विचार आणि भावना यांचा योग्य तो मेळ घालता आला पाहिजे. ज्या माणसांना हे जमते ती माणसे जीवनात यशस्वी होतात. आपण किती रागवायचे याचीही मर्यादा आपल्याला कळली पाहिजे. जरी चूक झाली असली तरी त्याची चूक का झाली असावी, याचा विचार केला पाहिजे. तसेच त्या व्यक्तीस प्रेमाने समजावून सांगून परत अशी चूक न करण्यासाठी सांगितले पाहिजे. त्यासाठी खूप रागावणे आवश्यक नसते. प्रत्येकाच्या मनात कोणत्याही भावना उत्पन्न होणे, हे नैसर्गिकच आहे. पण त्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विचार करणेही खूप गरजेचे असते. “भावनांवर नियंत्रण ठेवणे, भावनांचा मेळ घालता येणे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे, याला ‘भावनिक समायोजन’ असे म्हणतात.”