आपले भावनिक जग

काही प्रसंग

views

3:41
मुलांनो, पुढे काही प्रसंग दिले आहेत. त्या प्रसंगातील जे प्रसंग चांगले आहेत, ते त्याला योग्य आहेत असे उत्तर दया. जे करू नये असे तुम्हांला वाटते त्यावर ते अयोग्य आहेत असे उत्तर दया. शि: प्रसंग – 1 – रमेशने सुरेशला त्याच्याबद्दल अमितने काहीतरी वाईट बोलल्याचे सांगितले, परंतु सुरेशने त्याची खात्री करून घेऊनच प्रतिक्रिया देण्याचे ठरविले. वि: योग्य. आपल्यातील उणिवांची जाणीव :- मुलांनो, उणिवा म्हणजे आपल्यातील कमतरता होय. आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येकामध्ये काही क्षमता व काही उणिवा असतात. कोणतीच व्यक्ती परिपूर्ण नसते. उदा. आपण एखादया विषयात, कलेत, नृत्यात अधिक तरबेज असू, म्हणून आपण सर्वच बाबतीत तरबेज असतो असे होत नाही. म्हणूनच आपल्या क्षमता व उणिवा दोन्हीही आपल्याला माहीत असणे गरजेचे असते. म्हणजे त्या उणिवांवर आपण प्रयत्न करून मात करू शकतो. आपण अभ्यासात एकदम हुशार असू व खेळात मागे पडत असू, तर आपल्याला खेळावरही लक्ष देऊन त्यातही सामील होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी गोष्ट येत नाही, म्हणून जे येते त्यात विशेष कामगिरी करण्याकडे किंवा ती गोष्ट अधिक चांगल्याप्रकारे करण्याकडे दुर्लक्ष करू नये.