आपले भावनिक जग

स्वभाव बदलता येतो

views

4:39
स्वभाव बदलता येतो : मुलांनो, आपल्या वर्गात जेवढी विदयार्थी संख्या आहे, त्यांपैकी कुणाचाच स्वभाव पूर्णत: वाईट किंवा पूर्णत: चांगला असू शकत नाही. तर तुमच्यापैकी प्रत्येकाच्या स्वभावात काही गुण आणि काही दोष असतात. तुम्ही मित्रमैत्रिणी एकत्र असताना तुम्हांला ते जाणवत असेल. जर सर्वांमधेच चांगले वाईट गुण आहेत, तर मग एकमेकांना दोष न देता सर्वांनी चांगले गुण वाढविण्याचा आणि वाईट गुण कमी करण्याचा एकमेकांच्या मदतीने प्रयत्न केला पाहिजे. उदा. आपल्याला न अडखळता स्पष्ट वाचता येते. हे आपल्या क्षमतेबद्दल आपण बोलतो, तसेच मला न बघता लिहिता येत नाही, हे आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितल्यामुळे ते आपल्यातील ही उणीव दूर करण्यासाठी मदत करतील. आपण काय शिकलो? मुलांनो, या पाठातून आपण पुढील बाबींचा विचार केला. 1) भावना व्यक्त केल्या पाहिजेत. विचार आणि भावनांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे. 2) शारीरिक रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा त्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात. 3) आपल्याला आपल्यातील क्षमतांबरोबर आपल्यातील उणिवांचीही जाणीव असली पाहिजे. 4) आपल्यात काही उणिवा असतील त्या प्रयत्न करून बदलता येतात. अशा प्रकारे आपण या पाठातून काही महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास केला आहे.