मूलद्रव्ये,संयुगे आणि मिश्रणे

मूलद्रव्य

views

3:27
आपण पाहिले की पदार्थ हे बारीक बारीक कणांनी बनलेले असतात. पदार्थांचे हे अतिसूक्ष्म कण म्हणजेच रेणू असतात. आणि ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात, त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. थोडक्यात एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य होय. आजपर्यंत एकूण ११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यांपैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. आणि २६ मूलद्रव्ये ही मानवनिर्मित आहेत. या मूलद्रव्याचे विघटन म्हणजेच आणखी छोटे भाग करता येत नाही. असे जर विघटन केलेच तर त्यापासून वेगळा पदार्थ मिळत नाही. कोणत्याही मूलद्रव्याचे कण हे एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेले असतात. असा हा अणू जरी आपल्याला डोळ्यांनी दिसत नसला तरी असे कोट्यावधी अणू एकत्र आले, की त्याचे आकारमान सहज दिसू शकते. प्रत्येक मूलद्रव्यातील अणूचे वस्तुमान व आकारमान निरनिराळे असते. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, लोह, पारा, तांबे ही काही महत्त्वाची नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत. हवेत हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, अर्गोन, क्रिप्टॉन व झेनॉन ही मूलद्रव्ये असतात. यातील ऑक्सिजन हा निसर्गात वायुरूपात आढळतो. ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. म्हणून हवेमध्ये ऑक्सिजन नेहमी रेणू स्वरूपात आढळतो. अणू जसे डोळ्यांनी दिसत नाहीत, तसेच रेणू देखील डोळ्यांनी दिसत नाहीत.