मूलद्रव्ये,संयुगे आणि मिश्रणे

संयुगे

views

2:41
संयुगे म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ होय. संयुगाचा लहानांत लहान कण रेणू असतो. मात्र रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील, तरच तयार होणारा पदार्थ हा संयुग असतो. उदा. पाणी. पाण्याच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू असतो. यासाठी एका परीक्षानळीत साखर घेतली. आणि परीक्षानळीला उष्णता दिली. पहा, साखरेला उष्णता दिली तर त्यातील परीक्षा नळीत आता केवळ काळ्या रंगाचा कार्बन शिल्लक राहिला आणि पाण्याची वाफ बाहेर निघून गेली. साखर म्हणेच कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे संयुग. त्यातील पाणी म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन(H2O) निघून गेल्यावर कार्बन शिल्लक राहतो. आपण पाहतो की आग लागली की वाऱ्याच्या वेगाने ती जास्तच वाढते. कारण ऑक्सिजन हे मूलद्रव्य ज्वलनास मदत करते. याउलट पाणी ज्वलन थांबवते. यावरून असे म्हणता येईल की संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात. उदा. हायड्रोजन हा ज्वलनशील असल्याने स्वतः जळतो. ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो; परंतु पाण्यात हे दोन्ही रेणू असून पाणी आग विझवते