मूलद्रव्ये,संयुगे आणि मिश्रणे

माहिती

views

3:55
तुम्हाला माहीतच आहे की, पदार्थाच्या तीन अवस्था आहेत त्या म्हणजे – स्थायू, द्रव, आणि वायू. उदा. पाणी द्रवरूप अवस्थेत असते. त्याला उकळले तर त्याची वाफ होऊन ते वायुरूप अवस्थेत जाते. आणि जेव्हा ते फ्रीझर मध्ये ठेवून त्याचा बर्फ बनतो तेव्हा ते स्थायुरूप अवस्थेत जाते. तर पदार्थाचे हे असे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रुपांतर होणे म्हणजेच पदार्थांचे अवस्थांतर होय. आपण पदार्थांचे वेगवेगळे गुणधर्मही अभ्यासले आहेत. जसे ठिसूळपणा ,कठीणपणा, घनता, अविद्राव्यता विद्राव्यता, पारदर्शकता, स्थितिस्थापकता, प्रवाहिता इत्यादी. पण जरी पदार्थाचे हे गुणधर्म असले तरीही हे गुणधर्म सर्व पदार्थात सारखे नसतात. कारण साखर जशी पाण्यात विरघळते तसा दगड पाण्यात विरघळत नाही. लोखंडामध्ये जसा कठीणपणा असतो तसा तो कापसामध्ये आढळत नाही. यावरून आपल्याला समजते की प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म वेगवेगळे असतात.वस्तू कशापासून बनतात? तर वस्तू या पदार्थांच्या किंवा द्रव्यांच्या बनलेल्या असतात. आपल्या आजूबाजूच्या काही वस्तू या मुलद्रव्यांनी, संयुगांनी, मिश्रणांनी बनलेल्या असतात. माती दगडाच्या बारीक कणांनी बनते. तसेच विजेची तार, किंवा तांबे या वस्तू धातूंच्या बनलेल्या असतात. तर आपल्या घरातील भांडी ही स्टील, लोखंड, तांबे, पितळ हया निरनिराळ्या धातूंची बनलेली असतात. खिळे लोखंडाचे असतात.