मूलद्रव्ये,संयुगे आणि मिश्रणे

मिश्रण

views

3:21
जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किवा संयुगे एकमेकांत मिसळली जातात, त्याला मिश्रण असे म्हणतात. जेव्हा आपण लिंबू सरबत बनवतो तेव्हा लिंबू, साखर, आणि थोडेसे मीठ हे सर्व पदार्थ पाण्यामध्ये टाकून एकत्र करतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्यांचे मिश्रण करतो. तसेच जेव्हा जेव्हा आपण भेळ बनवतो तेव्हा त्यांमध्ये शेव, कांदा, मुरमुरे, उकडलेला बटाटा, कोंथिबीर, शेंगदाणे, मीठ हे सर्व पदार्थ त्यात एकत्र करून भेळ तयार करतो. म्हणजे या ठिकाणी देखील आपण मिश्रणाच करतो. यामध्ये जर आपल्याला वाटले कि भेळीमध्ये कांदा किंवा शेंगदाणे जास्त झाले आहेत तर ते आपण काढून बाजूला करू शकतो. याचाच अर्थ असा होतो की, मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. तसेच मिश्रणातील मूळ घटक पदार्थाचे गुणधर्म कायम राहतात. उदा. मीठ, साखर, पाणी इत्यादी. मिश्रणातील विविध घटकांचे प्रमाण निश्चित नसते. आणि मिश्रणे तयार होताना कोणताही रासायनिक बदल घडून येत नाही किंवा संयुगे तयार होत नाहीत.मिश्रणाचा आणखी एक प्रकार म्हणजे भेसळ होय. एखाद्या पदार्थात अनावश्यक व हानिकारक पदार्थ मिसळणे म्हणजेच भेसळ होय. असे भेसळयुक्त पदार्थ शरीरास हानिकारक असतात. ते शरीरास उपयुक्त राहत नाहीत. मिश्रणातून हे अनावश्यक व हानिकारक असणारे घटक वेगळे करण्यासाठी गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे, संप्लवन अशा पद्धतींचा वापर केला जातो.