मूलद्रव्ये,संयुगे आणि मिश्रणे

अपकेंद्री पद्धत

views

4:3
काही द्रवपदार्थांमध्ये स्थायू कण आपल्याला दिसतात. हे कण द्रव पदार्थात अविद्राव्य म्हणजेच विरघळत नाही. उदा. गढूळ पाणी, शाई, रक्त, ताक. इत्यादी. तुम्ही गढूळ पाणी पाहिले असेलच, ते जेव्हा स्थिर राहते तेव्हा मातीचे कण तळाशी जाऊन बसतात. दूध, शाई यातील कण तळाशी जाऊन बसत नाहीत कारण अशा मिश्रणातील स्थायुचे कण लहान व ह्लके असतात. द्रव आणि स्थायूच्या मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी सेंट्रिफ्यूज म्हणजेच अपकेंद्री यंत्राचा वापर करतात. या यंत्रात पंख्याप्रमाणे वेगाने फिरणारी एक तबकडी असते. या तबकडीच्या कडेशी परीक्षानळ्या जोडलेल्या असतात. या परीक्षानळ्यांत मिश्रण भरले जाते. या नळ्या वेगाने फिरत असताना त्यातील द्रव्यातील कणांवर तबकडीच्या केंद्रापासून दूर ढकलणारे बल निर्माण होते. या बलामुळे मिश्रणातील स्थायू कण तळाशी जमा होऊन द्रवापासून वेगळे होतात. घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत आहे. लोणी ताकापासून वेगळे करण्यासाठी ताक घुसळले जाते. कारण ताकात लोण्याचे कण मिसळलेले असतात. घुसळण केल्याने ते एकत्र येऊन त्याचा एकच गोळा बनतो.