बाह्यप्रक्रिया भाग २

हिमनदीचे वहन व संचयन कार्य

views

4:02
नदीचे खनन कार्य व त्यापासून तयार होणाऱ्या भूरुपांची माहिती घेतल्यानंतर आता आपण हिमनदीचे वहन व संचयन कार्य पाहणार आहोत. हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोढ असे म्हणतात. नदीने वाहून आणलेला गाळ कोठेकोठे साचतो. त्या स्थानांनुसार हिमोढाचे चार प्रकार पडतात. १)भू-हिमोढ २)पार्श्व हिमोढ ३)मध्य हिमोढ व ४)अंत्य हिमोढ. या दिलेल्या आकृती वरून तुमच्या लक्षात येईल की, १) भू-हिमोढ म्हणजे हिमनदीच्या तळाशी संचयित झालेला हिमोढ होय. २)हिमनदीच्या काठावरील भागात साचलेल्या हिमोढास पार्श्व हिमोढ असे म्हणतात. ३)जेव्हा दोन हिमनद्या एकत्र येतात तेथे त्यांच्या आतील दोन कडांच्या भागातील पार्श्व हिमोढांपासून मुख्य हिमनदीच्या पात्रात तयार होतो तो मध्य हिमोढ होय. ४)हिमप्रवाहाचे जेथे जलप्रवाहात रूपांतर होते, तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोढ पुढे वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे या भागात हिमोढ साचतो. हा हिमोढ हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्यामुळे त्याला अंत्य हिमोढ असे म्हणतात. अशा तऱ्हेने हिमोढाचे प्रकार पडतात. जे आकृतीत बघितल्यानंतर आपल्या पटकन लक्षात येतात. ही झाली हिमनदीच्या वहन कार्यातून तयार होणारी भूरूपे. आता आपण हिमनदीच्या संचयन कार्यातून तयार होणारी भूरूपे बघू. हिमनदीच्या संचयन कार्यातून १) हिमोढगिरी व २) हिमोढकटक ही भूरूपे तयार होतात.