बाह्यप्रक्रिया भाग २

सागरी लाटांचे कार्य व भूरूपे

views

2:57
समुद्रकिनारी भागात सागरी लाटा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतात. वारा, भरती-ओहोटी यांमुळे सागरजलाची हालचाल होते. त्यामुळे लाटा किनाऱ्याकडे येतात. किनाऱ्यावर असलेल्या खडकांच्या भागात या लाटांच्या माऱ्यामुळे खनन घडून येते व पुळणी सारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन घडून येते. सागरी लाटांचे खनन कार्य: लाटा किनाऱ्यावर येऊन फुटतात म्हणजेच त्या किनारी भागात जोरने आपटतात. त्याचबरोबर त्या लाटांमध्ये असलेले पाणी, तसेच त्याबरोबर वाहून आलेले दगड, गोटे रेती, वाळू यांसारखे पदार्थ जोराने किनाऱ्यावर आपटतात. त्यामुळे किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या या खनन कार्यातून तरंगघर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान व सागरी स्तंभ इ भूरूपे निर्माण होतात. त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ.