बाह्यप्रक्रिया भाग २

सागरी लाटांचे संचयन कार्य

views

3:41
आता आपण सागरी लाटांचे संचयनकार्य बघू.किनाऱ्याची झीज झाल्यामुळे सुटे झालेले पदार्थ सागरतळावर साठतात. म्हणजेच सागरी लाटांमुळे खडकापासून वेगळे झालेले तुकडे लाटांबरोबर समुद्रात जातात व ते सागरतळावर साठतात. भरती-ओहोटीमुळे या पदार्थांची किनाऱ्याकडे व परत सागराकडे हालचाल सुरू असते. या सतत होणाऱ्या क्रियेमुळे हे पदार्थ एकमेकांवर आपटून बारीक होतात. अशा बारीक झालेल्या पदार्थांचे संचयन लाटांचा प्रभाव कमी असलेल्या किनारी भागात होते. सागरी लाटांच्या या संचयन कार्यातून पुळण, वाळूचा दांडा, खाजण इ भूरूपे तयार होतात. या सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे 1.पुळण: दोन भूशिरांदरम्यान असलेला भाग, भूशिरांमुळे सागरी लाटांच्या माऱ्यापासून काहीसा सुरक्षित असतो. किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटांचे सातत्याने वक्री भवन होत असते. या वक्रीभवन प्रवृत्तीमुळे भूशिराच्या भागात लाटा एकवटल्या जातात, तर दोन भूशिरांच्या मध्ये त्या विभागात त्यामुळे त्यांच्यात सामावलेली ऊर्जा देखील विभागते, त्यामुळे तालांची वाहण्याची क्षमता कमी होते. लाटांबरोबर वाहून आणलेल्या वाळूचे संचयन घडते. ही क्रिया सतत घडल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वाळू साचून पुळणी तयार होतात. 2.वाळूचा दांडा: पुळणीवरची वाळू ही लाटांमार्फत समुद्रात नेली जाते. परंतु, अशी वाळू फार लांबवर न जाता कमाल ओहोटीच्या मर्यादेपासून काही अंतरावर पुळणीला समांतर अशा बेटांच्या स्वरुपात साचते. कालांतराने ही बेटे मोठी व उंच होतात. त्यांची उंची भरतीच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होते आणि बेटांची रांगच तयार होते. अशी बेटे एकमेकांस जोडली जाऊन सलग असा वाळूचा दांडा तयार होतो. पुळणीस समांतर असलेल्या या दांड्यामुळे खाजण सरोवराची निर्मिती होते. चिल्का सरोवर हे असेच बनले आहे.