भारताची सुरक्षा व्यवस्था

राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग

views

3:30
राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध भौगोलिकतेशी जोडलेला असतो. कारण भौगोलिकदृष्ट्या अधिक जवळ असणाऱ्या राष्ट्रांकडून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. उदा. भारताचा विचार केला तर भारताला चीन, पाकिस्तान यांसारख्या भौगोलिक दृष्ट्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांपासून धोका निर्माण झाला आहे. आपल्या भौगोलिक सीमारेषांना असलेला धोका कोणता आहे, आणि तो कोणाकडून आहे हे ओळखणे महत्त्वाचे असते. 2. हा धोका दूर ठेवायचा असेल तर त्यासाठी राष्ट्राला आपली लष्करी ताकद वाढवावी लागते. १९६२ नंतर भारताने आपली लष्करी ताकद वाढविली. याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून धोक्याविषयी अंदाज बांधणे, शस्त्रास्त्रनिर्मिती, संरक्षण दलांचे आधुनिकीकरण व ती अद्ययावत करणे इ. मार्ग अवलंबले जातात. मुलांनो, भारताचा विचार करता भारताने १९६२ नंतर वरील सर्व मार्ग अवलंबिले. म्हणूनच २०१७ मध्ये चीनने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असता भारतीय सैन्याने त्यांना सडेतोड उत्तर दिले. 3. युद्धाच्या मार्गाने संघर्ष सोडविणे व राष्ट्रीय सुरक्षेची जपणूक करणे अधिक तणावाचे आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारे असते, हे आपण पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर जाणले आहे. म्हणून काही राष्ट्रे अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळवून राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका कमी करण्याचा प्रयत्न करतात. २०१७ मध्ये चीन - भारत यांच्यात तणाव निर्माण झाला. त्यावेळी भारताने अमेरिका, जपान, रशिया , इस्त्राईल यांसारख्या जगातील बड्या राष्ट्रांचा पाठिंबा मिळविला. त्यामुळे तणाव कमी होऊन सीमा भागात शांतता निर्माण झाली. आंतरराष्ट्रीय संघर्ष शांततेच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्राने केला पाहिजे. त्यासाठी राष्ट्राराष्ट्रांमधील संवाद आणि देवाणघेवाण वाढली पाहिजे. राष्ट्राराष्ट्रांमध्ये जितके जास्त परस्परावलंबन, तितकी अधिक शांतता व सुरक्षितता वाढेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढण्यासाठी चर्चा व वाटाघाटींसाठी वेगवेगळी माध्यमे आणि व्यासपीठे उपलब्ध होतील.आर्थिक नुकसानीच्या भीतीमुळे राष्ट्र युद्धे टाळण्याचा प्रयत्न करतील.