भारताची सुरक्षा व्यवस्था

मानवी सुरक्षा

views

4:09
राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शीतयुद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सीमा सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाची सुरक्षा करायची ती कोणासाठी ? तर त्या देशात राहणाऱ्या लोकांसाठीच असते. म्हणूनच मानवास केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. मानवी सुरक्षा या संकल्पनेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित असते. लोकांच्यात असणारी निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षतेत होतो. अल्पसंख्य म्हणजे संख्येने कमी असणारे लोक. उदा. इसाई, ज्यू इ. यांसारखे अल्पसंख्य व दुर्बल गट म्हणजे ज्यांच्यात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विकास झाला नाही. अशा वर्गाच्या लोकांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे.