भारताची सुरक्षा व्यवस्था

निमलष्करी दले

views

3:59
भारताच्या संरक्षण यंत्रणेचे प्रमुख तीन विभाग आपण बघितले. या तीन दलांव्यतिरिक्त अजून दोन दलांचा समावेश भारताच्या संरक्षण व्यवस्थेत होतो. त्यातील एक म्हणजे निमलष्करी दले होय. भारतातील प्रमुख तीन संरक्षणदलानां मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात. ही दले पूर्णतः लष्करी नसतात. ती राज्य पोलीस दलांसारखी नागरीही नसतात. म्हणून त्यांना निमलष्करी दले असे म्हणतात. संरक्षण दलांना मदत करणे हे त्यांचे प्रमुख काम असते.भारतात पुढील सुरक्षा दले कार्यरत आहेत. १) सीमा सुरक्षा दल (Border Security Force) २) तटरक्षक दल (Coast Guard) ३) केंद्रीय राखीव दल पोलीस. (Central Reserve Police Force) ४) जलद कृतीदल (Rapid Action Force) हया सुरक्षा दलांचा समावेश निमलष्करी दलांत होतो. देशातील रेल्वे स्थानके, तेलसाठे, पाणीसाठे इ. महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलांची असते. तसेच नैसर्गिक आपत्तींमध्ये व मानवनिर्मिती आपत्तींमध्ये मदत करण्याची जवाबदारी त्यांची असते. उदा. पूर, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, जातीय दंगे, बॉम्बस्फोट या आपत्तींवर मात व नियंत्रण करण्यासाठी निमलष्करी दलांची मदत होते.