भारताची सुरक्षा व्यवस्था

भारताच्या सुरक्षितते पुढील आव्हाने

views

4:11
१) दीर्घकाळापासून म्हणजे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान व चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वाद निर्माण करणारे प्रश्न आहेत. उदा. काश्मीरची समस्या- जम्मू आणि काश्मीर हे राज्य दहशतवादी कारवायांनी ग्रासलेले आहे. पाणी वाटपाविषयीचे तंटे- भारतातून पुढे पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून या दोन देशांत वाद आहेत. घुसखोरीची समस्या- सीमेपलीकडून भारतात होणारी घुसखोरी. सीमावाद- आंतरराष्ट्रीय सीमांसंबंधी असणारे वाद-विवाद इ. हे प्रश्न चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा भारताने सातत्याने प्रयत्न केला आहे. २) आशिया खंडातील दोन महत्त्वाचे देश म्हणून भारत व चीन या दोन देशांकडे पाहिले जाते. १९६२ मध्ये चीन बरोबर आपले युद्धही झाले. तेव्हापासून भारत-चीन संबंध जास्तच बिघडले. भारताच्या शेजारी असणाऱ्या देशांवर चीनने आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भारत व चीन यांच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. भारत व चीन यांच्यामधील मॅकमोह्न सीमारेषेबाबतही वाद सुरू आहे. अलीकडेच भारत-चीन संबंध ताणले जाण्याला कारणीभूत ठरला डोकलाम प्रदेश. हा प्रदेश भूतानशी संबंधित आहे. आशियातील भारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमारेषा या विवादित प्रदेशात येऊन मिळते. या प्रदेशात चीनने रस्ता बांधायला घेतला आणि याला भूतानने आक्षेप घेतला. भारताने भूतानची बाजू घेतल्याने चीन-भारत संबंध बिघडले. ३) सुरक्षा या विषयाची व्याप्ती मोठी आहे. भारताला बाह्य व अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. बाह्य सुरक्षा म्हणजे परकीय राष्ट्राकडून केल्या जाणाऱ्या आक्रमणापासून सुरक्षा. त्याची माहिती आपण याआधीच्या मुद्द्यात घेतली आहे. अंतर्गत क्षेत्रातूनही सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असतो. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत आता बाह्य सुरक्षितता व अंतर्गत सुरक्षितता असा फरक महत्त्वाचा राहिला नाही ४) दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातील सर्वात मोठे आव्हान आहे. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पूर्ण समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे दहशतवाद होय.