भारताची सुरक्षा व्यवस्था

भारताची सुरक्षा यंत्रणा

views

4:16
प्रत्येक देशाची सुरक्षा यंत्रणा असते. तशीच सुरक्षा यंत्रणा आपल्या देशाची आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणेत भूदल, नौदल व वायुदल या संरक्षण करणाऱ्या तीन दलांचा समावेश होतो. १) भूदल: भारताच्या भौगोलिक/जमिनीवरील सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर असते. २) नौदल: भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी नौदलावर असते. ३) वायुदल: भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदल/हवाई दलाची असते. या तीनही दलांवर भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. भारतातील भूदल खूप मोठे असून ते जगातील सातव्या क्रमांकाचे मानले जाते. भारतीय भूदलात १३,२५,००० नियमित व ११,५५,००० राखीव सैनिक आहेत. भूदलाच्या प्रमुखाला जनरल असे म्हणतात. सध्याचे जनरल बिपीन रावत हे आहेत. भूदलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ‘ध्रुव’, ‘चेतक’, ‘सी किंग’ इ. शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व ‘सी हॅरियर्स’ या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट, डेली क्लास, त्रिशूळ आणि मिसाईलचा मारा करणारी ‘विनारा’ ही नौका व ‘संकुश’ पाणबुडी इत्यादी भारतीय नौदलाचे भाग आहेत. ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. नौदलात एकून ५६,००० खलाशी आहेत. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. नौदलाचे प्रमुख ‘अॅडमिरल’ असतात. सध्याचे अॅडमिरल सुनील लांबा आहेत.