पर्यावरण आणि आपण

प्रदूषण

views

5:13
प्रदूषण: प्रदूषण म्हणजे एखाद्या शुध्द घटकात अशुद्ध घटक मिसळून तो घटक दूषित होणे म्हणजेच प्रदूषण होय. पाणी या पाठात आपण पाण्याचे प्रदूषण कसे होते ते थोडक्यात पाहिले आहे. स्वयंपाकघरातील सांडपाणी किंवा कारखान्यांतील सांडपाणी जलस्त्रोतात म्हणजेच नदी, ओढा, तलाव अशा ठिकाणी सोडल्यास काय परिणाम होतो हे आपण पाहिले आहे. मुलांनो, हा पाहा भारतीय चित्ता. तो आज नामशेष झाला आहे. म्हणजे हा प्राणी पूर्वी आपल्या देशात होता, परंतु आता अस्तित्वात नाही.आज अशा प्रकारची तापमानात झालेली वाढ जगाच्या सर्वच भागांमधून दिसून येत आहे. याशिवाय इंधनाच्या ज्वलनातूनही मानवास, सजीवास अपायकारक असे काही विषारी वायू आणि मोठ्या प्रमाणावर धूरही निर्माण होतो. त्याचबरोबर उद्योगधंद्यामधूनही हवेत काही विषारी वायू मिसळतात. यासर्व कारणांमुळेही हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे.