पर्यावरण आणि आपण

जैवविविधता टिकवण्यासाठी प्रयत्न

views

2:32
जैवविविधता टिकवण्यासाठी प्रयत्न: जैवविविधता म्हणजे सजीवांमधील जाती, परिसंस्था किंवा पूर्ण पृथ्वीवरील सजीवांमधील विविधता होय. झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव पूर्णपणे सामूहिकरीत्या नष्ट होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी १% टक्का सजीव नष्ट झाले आहेत. हे असेच होत राहिले, तर संपूर्ण सजीवसृष्टीवर त्याचा परिणाम होईल, म्हणून पर्यावरणातील जैवविविधता टिकवणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ते पाहूया. जैवविविधता उद्द्याने: “पर्यावरणातील जैवविविधता रक्षण व संवर्धन म्हणजे त्याची जपणूक करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला “जैवविविधता उद्द्यान” असे म्हणतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती त्यांच्या उपजातींसह सांभाळले जातात. आणि जैवविविधतेचे रक्षणही केले जाते. राष्ट्रीय उद्दयाने: वनातील सजीवांचे संरक्षण व्हावे तसेच त्या जीवांची जपणूक करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवलेली असतात. त्यांना राष्ट्रीय उद्दयाने असे म्हणतात. उदा: ताडोबा राष्ट्रीय उद्दयान – चंद्रपूर यांसारखी काही राष्ट्रीय उद्याने आपल्या महाराष्ट्रात आहेत.