पर्यावरण आणि आपण

देवराई – एक वरदान!

views

3:10
देवराई – एक वरदान! भारतीय संस्कृतीमध्ये वनसंरक्षणाचा विचार झालेला आहे. देवराई हे याचे एक उदाहरण आहे. भारतीय संस्कृतीतील जैवविविधता सांभाळणारी धार्मिक आणि पर्यावरणीय संकल्पना म्हणजे देवराई होय. या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही. त्यामुळेच देवराईतील झाडे आजही सुरक्षित आहेत. अशी अरण्ये सरकारच्या वनखात्याने सांभाळलेली नसून परंपरेने, समाजाने सांभाळलेली असतात. महाराष्ट्रात अशा अनेक देवराया आहेत. मध्यप्रदेश या राज्यात आढळणाऱ्या देवराया ‘शरणवने’ म्हणून ओळखल्या जातात. मुलांनो हे नेहमी लक्षात ठेवा की, निसर्ग सर्वांची सर्व प्रकारची गरज भागवू शकतो. परंतु मानवाला जी अति मिळविण्याची, प्राप्त करण्याची हाव आहे, तो ती भागवू शकत नाही. कारण मानवाची हाव कधीही न संपणारी आहे. आपण काय शिकलो: मुलांनो या पाठातून आपण पुढील गोष्टी शिकलो: १. पर्यावरणातील जैविक व अजैविक म्हणजेच सजीव व निर्जीव घटकांचे एकमेकांशी संबंध असतात. उदा. पाणी या अजैविक घटकावर सर्व जैविक घटक अवलंबून असतात. २. वेगवेगळ्या प्रदेशात तेथे असलेल्या घटकांनुसार वेगवेगळे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. कारण त्यांच्या वाढीला पोषक घटक जिथे उपलब्ध होतात, तिथेच त्यांची वाढ होत असते.