पर्यावरण आणि आपण

अभयारण्ये

views

4:40
अभयारण्ये: विशिष्ट प्राण्यांचे, वनस्पतींचे, पक्ष्यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे यांसाठी काही वनक्षेत्र राखीव ठेवले जाते. अशा राखीव क्षेत्राला ‘अभयारण्य’ असे म्हणतात. उदा. कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी अभयारण्य, कर्नाळा अभयारण्य, कोयना अभयारण्य, भीमाशंकर अभयारण्य यांसारखी प्रमुख अभयारण्ये महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील सातारा जिल्हयात चांद नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधल्या गेलेल्या धरणामुळे ‘मायणी’ तलाव तयार झाला आहे. या तलावावर ‘रोहित पक्षी’ उत्तर आशियातील सायबेरिया या प्रदेशातून स्थलांतर करून येतात. कारण याठिकाणी पाणी व ऊन पुष्कळ असल्याने त्यांना भरपूर खादय उपलब्ध होते. त्यामुळे त्यांच्या पिल्लांचे पालनपोषण चांगले होते. तसेच हा पक्षी पाणथळ जागी थव्याने राहणारा आहे. आताच्या काळात मायणी तलावातील पाणी कमी झाल्यामुळे रोहित पक्षी येण्याचे प्रमाण कमी झाले होते, परंतु स्थानिक लोकांनी मागणी करून हे मायणी तलाव क्षेत्र पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून जाहीर केले. त्यामुळे याठिकाणी रोहित पक्ष्यांबरोबर चक्रवाक, घार, गरुड, राखी, बगळा, सूर्य, खंड्या, कवड्या, ससाणासारखे काही शिकारी पक्षीही आढळतात. मुलांनो, आपल्याला माहीत आहे की मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. दिल्ली, राजस्थान या राज्यांत मोर संख्येने खूप जास्त आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात मोरांची संख्या कमी आहे. . पुणे – अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे ५० कि.मी अंतरावर असलेले मोराची चिंचोली हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी सुमारे २५०० मोर आहेत. येथे पूर्वीपासून लावलेली चिंचेची झाडे आहेत. या झाडांची तेथील लोकांनी काळजीपूर्वक निगा राखल्यामुळे तेथील पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल आहे. त्यामुळे या गावात मोरांना अभय मिळाले आहे.