पर्यावरण आणि आपण

बोलते व्हा. चर्चा करा

views

3:02
बोलते व्हा. चर्चा करा:- मुलांनो, तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या जवळील पहिली वस्तू संपून दुसरी वस्तू उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पुरेल एवढाच वस्तूंचा साठा असावा. पाणी: मानवाची पाण्याची गरजही खूप मोठी आहे. आणि प्रत्येक वर्षी पुरेसा पाऊस पडेलच याची शाश्वती देता येत नाही. म्हणून आपण शक्य तेवढे पाणी अडवून, जिरवून व त्यातील थेंबाथेंबाचा वापर करून पाणी साठा करून ठेवला पाहिजे. अन्न: मुलांनो, आपल्याला काम करण्यासाठी उर्जेची गरज असते व ही ऊर्जा आपल्याला अन्नामार्फत मिळत असते. म्हणून आपल्या शरीराला अन्नाची खूप गरज असते. यावर्षी पिकवलेले पीक पुढील वर्षापर्यंत पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा करून ठेवता आला पाहिजे. वस्त्र: मानवाने वस्त्राचा वापर आपले शरीर झाकण्यासाठी व ऊन, वारा, पाऊस यांपासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी सुरू केला. पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न: मुलांनो, पर्यावरण आपल्यासाठीच आहे. असे गृहीत धरून आपण गेली काही दशके त्यातील विविध घटकांची हानी करत आलो आहोत. परंतु त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागले आहेत. म्हणून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. विशिष्ट वर्षांनंतर वाहने बदलावीत असे नियम करून प्रदूषणावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आपल्या देशात केला जात आहे.