परिमिती व क्षेत्रफळ

उदाहरणे (1)

views

2:54
मुलांनो, या उदाहरणात चौरसाची बाजू काढायची आहे. पण त्या अगोदर आयताची परिमिती काढल्याशिवाय चौरसाची बाजू काढता येणार नाही. म्हणून वरील उदाहरणामध्ये दोन्ही सूत्राचा वापर करावा लागणार आहे. तर सर्वप्रथम आपण आयताची परिमिती काढून घेऊ. आता आपल्याला चौरसाची बाजू काढायची आहे. उदाहरणात सांगितल्याप्रमाणे चौरसाची परिमिती ही 96 सेमी असेल. चौरसाची बाजू a असल्यास 4a = 96 येथे चौरसाच्या परिमितीचे सूत्र लिहू आणि गणित सोडवू. चौरसाची परिमिती = 4 × a. = (4 ×a)/4 = 96/4 म्हणून a = 24 सेमी. म्हणजेच त्या चौरसाची बाजू 24 सेमी असेल. या उदाहरणाचा ताळा करून आपण पडताळा घेऊ शकतो. जर चौरसाची एक बाजू 24 असल्यास सर्व बाजूंची लांबी 24 सेमी असेल. म्हणून, 24 + 24 + 24 + 24 = 96 सेमी.