परिमिती व क्षेत्रफळ

उदाहरणे (2)

views

4:31
उदा.2) एका 40 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा एका आयताकृती बागेच्या आत कुंपणालगत बागेभोवती 2 मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे. त्या रस्त्यावर 25 सेमी x 20 सेमी आकाराच्या फरश्या बसवायच्या आहेत. तर अशा किती फरश्या आणाव्या लागतील? उत्तर: मुलांनो, याप्रकारची उदाहरणे सोडवताना सर्वप्रथम प्रश्न नीट समजण्यासाठी कच्ची आकृती काढावी लागेल. ज्या भागात फरश्या बसवायच्या आहेत त्या भागाचे क्षेत्रफळ काढण्याअगोदर आपण त्या बागेचे क्षेत्रफळ काढू, बागेचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी = 30 x 40 = 1200 चौ.मी रस्ता सोडून आतील भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी बागेची जी लांबी व रुंदी दिली आहे त्यामधून रस्त्याची लांबी व रुंदी वजा करूया म्हणजेच 30 – 4 = 26 (दोन्ही बाजूची लांबी व रुंदी मिळून 2 + 2 = 4 म्हणून 30 मधून 4 व 40 40 – 4 = 36 मधून 4 मी वजा केले असता आतील भागाची लांबी व रुंदी मिळाली.) आता आतील भागाचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी = 26 x 36 = 936 चौ.मी फरश्या जिथे बसवायच्या आहेत त्याचे क्षेत्रफळ काढण्यासाठी बागेच्या क्षेत्राफळातून रस्ता सोडून उरलेल्या बागेचे क्षेत्रफळ वजा करावे लागेल. म्हणून 1200 – 936 चौ.मी = 264 चौ.मी म्हणून 264 चौ.मी एवढया भागात फरश्या बसवायच्या आहेत. 100 सेमी = 1 मी. असते. म्हणून 25 सेमी = 25/100 मी आणि 20 सेमी = 20/100 मी. म्हणून प्रत्येक फरशीचे क्षेत्रफळ = 25/100 x 20/100 = 1/20 चौ.मी म्हणून एका फरशीचे क्षेत्रफळ = 1/20 चौ.मी आहे. तर 264 चौ.मी मध्ये एकूण किती फरश्या बसवाव्या लागतील? तर फरश्यांची संख्या = (जागेचे एकूण क्षेत्रफळ)/(एका फरशीचे क्षेत्रफळ) = 264 ÷ 1/20 = 264 x 20 = 5280 म्हणून 5280 फरश्या आणाव्या लागतील.