परिमिती व क्षेत्रफळ

पृष्ठफळ

views

6:19
पृष्ठफळ : मुलांनो, आता आपण पृष्ठफळ म्हणजे काय ते बघूया. कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ होय. 1. इष्टिकाचितीचे पृष्ठफळ :- इष्टिकाचितीला 6 पृष्ठे असतात. प्रत्येक पृष्ठ आयताकृती असते. समोरासमोरील आयताकार पृष्ठाचे क्षेत्रफळ समान असते. इष्टिकाचितीची प्रत्येक कडा तिला जोडणाऱ्या इतर दोन कडांना लंब असते. इष्टिकाचितीच्या आडव्या पृष्ठाची लांबी ℓ (small एल) ने व रुंदी b ने दाखवू. उभ्या पृष्ठांची उंची h ने दाखवू. घन : आता घन म्हणजे काय ते पाहू. 1) घनला 6 पृष्ठे असतात. 2) घनाची पृष्ठे चौरसाकार असतात. 3) सर्व पृष्ठांची क्षेत्रफळे समान असतात. 4) चौरसाची बाजू ℓ (एल) मानू. घनाच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ = एका चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)2 किंवा ℓ 2 घनाचे एकूण पृष्ठफळ = 6 x चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज = 6 x (बाजू)2 किंवा घनाचे एकूण पृष्ठफळ = 6 x ℓ2 = 6 ℓ2 या सूत्राचा वापर करून इष्टिकाचिती व घनाचे पृष्ठफळ कसे काढतात.