परिमिती व क्षेत्रफळ

क्षेत्रफळ

views

2:18
क्षेत्रफळ (Area): मुलांनो, आता आपण क्षेत्रफळ म्हणजे काय हे समजून घेऊया. वरील सर्व आकृतींचे निरीक्षण केले असता आपल्याला या आकृतीचा काही भाग रंगवलेला दिसतो. म्हणजे आकृतीने व्यापलेल्या भागास त्या आकृतीचे क्षेत्रफळ असे म्हणतात. विविध आकृतींचे आपण सूत्राचा वापर करून क्षेत्रफळ काढू शकतो. मागील इयत्तेमध्ये आपण चौरसाच्या आणि आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र पाहिले. त्याची आपण थोडी उजळणी करू. चौरसाचे क्षेत्रफळ = बाजू x बाजू = (बाजू)2 (बाजूचा वर्ग) आयताचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी = (l × b) क्षेत्रफळ हे चौरस मीटर, चौरस सेमी, चौरस किमी, या एककांत मोजतात.