पदार्थ, वस्तू आणि उर्जा

जरा डोके चालवा.

views

4:36
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. 1) मुलांनो, आपल्या रोजच्या वापरातील कोणकोणते पदार्थ आपण पूड स्वरूपात वापरतो, त्यांची नावे सांगा? हळद, चहा पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, मिरा पावडर, लाल तिखट, खाण्याचा सोडा, कपड्याचा सोडा, गव्हाचे बेसनाचे पीठ इ. पदार्थ आपण पूड स्वरूपात वापरतो. २) कपड्यांमध्ये डांबरगोळया (नॅप्थेलिन गोळया) ठेवतात. काही दिवसांनी त्या कपड्यांना डांबरगोळयांचा वास का येतो? कपड्यांमध्ये ठेवलेल्या गोळ्यांचे लहान कण कपड्यांवर बसल्यामुळे त्या कपड्यांना डांबरगोळ्यांचा वास येतो. ३) मुलांनो आपण पाहतो, की स्वच्छतागृहांमध्ये डांबरगोळया ठेवलेल्या असतात. त्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी हळूहळू लहान होतो. हे कशामुळे होत असेल? डांबर गोळ्यांचा आकार हळूहळू लहान होतो, कारण डांबरगोळीचे सतत वायुरूपातील लहान कणांत रूपांतर होत असते. म्हणजे स्थायुरूपातील डांबरगोळीचे वायुरूपातील कणांत रूपांतर होते. त्यामुळे डांबरगोळीचा आकार लहान होतो आणि काही दिवसांनी या गोळ्या लहान-लहान होत जाऊन नाहीशा होतात. आपण संस्कार भारती हा रांगोळीचा प्रकार काढण्यासाठी अगदी बारीक पिठाप्रमाणे असलेल्या रांगोळीचा वापर करीत असतो. तर ठिपक्याची रांगोळी काढण्यासाठी रवाळ कणांच्या स्वरूपातील रांगोळीचा वापर करतो. तर मग रांगोळीशीच संबंधित पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. समजा तुम्हांला रांगोळी काढायची आहे आणि तुमच्याजवळ रांगोळी नाही. अशा वेळी तुम्ही कोणकोणते पदार्थ घेऊन रांगोळी काढाल? १) अशावेळी आम्ही खडूंचा वापर करू. २) गिरणीत पडलेल्या पिठाचा वापर करू. ३) कोळसा बारीक कुटून त्याचा वापरही रांगोळी म्हणून करू. ४) चुनखडी बारीक करून तिचा वापर रांगोळी म्हणून करू.