पदार्थ, वस्तू आणि उर्जा

माहिती मिळवा

views

3:16
माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या. औष्णिक विद्युत केंद्रात ऊर्जेचे मूळ स्त्रोत कोणते असतात? कोळसा हा औष्णिक विद्युत केंद्रातील ऊर्जेचा मूळ स्त्रोत असतो. रोजच्या जीवनात आपण उष्णता ऊर्जा इतर कोणकोणत्या कामांसाठी वापरत असतो? वि: आपली सर्व प्रकारची दैनंदिन कामे करण्यासाठी आपण रोजच्या जीवनात उष्णता ऊर्जेचा वापर करतो. उदा. अभ्यास करणे, सायकल चालविणे, धावणे, मैदानी खेळ खेळणे व इतर प्रकारची शारीरिक कष्टाची कामे करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. अन्नपदार्थांच्या ज्वलनातून आपल्याला कामे करण्याची ऊर्जा मिळते. ऊर्जेची इतर रूपे – मुलांनो, आपल्याला फक्त गतिज ऊर्जाच मिळते असे नाही. आपण अशी अनेक यंत्रे वापरतो, ज्यात होणारे काम गतिज ऊर्जेमुळे होत नसून ऊर्जेच्या इतर रूपांमुळे होते. उदा. आपण पंखा चालविण्यासाठी विद्युत ऊर्जेचा वापर करतो. याच विदयुत ऊर्जेचा वापर आपण टीव्ही चालविण्यासाठी करतो. पंख्यात विदयुत ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होते. तर टीव्ही मध्ये विदयुत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश आणि ध्वनी ऊर्जेत होते. अशाच प्रकारे सूर्यचूल आणि सौरबंब (सोलर) यांमध्ये सौरऊर्जेचा वापर होतो. सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात. या क्रियेत सूर्यप्रकाशातील ऊर्जा अन्नपदार्थात साठवली जाते. या वनस्पतीतील ऊर्जा अन्नाद्वारे आपल्या शरीरात जाते. त्याच्या ज्वलनातून आपल्याला कामे करण्यासाठी ऊर्जा मिळते. म्हणजे सूर्य हासुद्धा ऊर्जेचा स्त्रोत आहे. कोळसा, खनिज तेल असे इंधन पदार्थ आपण जाळतो. तेव्हा त्यातील साठलेल्या ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते. त्यामुळे यांचा वापर आपण इंधन म्हणून करतो.