पदार्थ, वस्तू आणि उर्जा

माहीत आहे का तुम्हांला

views

3:59
कोळसा, खनिज तेल यांचे साठे मर्यादित आहेत. ते काही वर्षे पुरतील इतकेच शिल्लक आहेत. येणाऱ्या काही वर्षांत या इंधनाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासणार आहे. यांचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते. हे साठे मर्यादित असल्यामुळे भविष्यात आपल्याला वीजनिर्मितीसाठी सौरऊर्जा, अणुऊर्जा, पवनऊर्जा यांसारख्या ऊर्जांचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागेल. मुलांनो, आपणही जास्तीत – जास्त वीज बचत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गरज नसताना घरातील दिवे, पंखे बंद करावे. तसेच कमी अंतराच्या ठिकाणी जाण्यासाठी मोटारगाडी, दुचाकी यांचा वापर न करता सायकलचा वापर करावा. त्यामुळे खनिज तेलाची म्हणजे पेट्रोल, डिझेलची बचत होईल. काही ठिकाणी लाईट गेली असता बॅटरीच्या मदतीने प्रकाश निर्माण केला जातो. पूर्वी या बॅटरी सेल, चार्जिंगवर चालत असत. त्यानंतर डिझेलवर चालणारे जनरेटर आले. परंतु, यासर्वांपेक्षा स्वस्त थोडक्यात फुकट ऊर्जा देणाऱ्या सौरबॅटऱ्या आल्या. या बॅटरी सूर्यप्रकाशावर चार्ज होतात. त्यांना वेगळे इंधन किंवा ऊर्जा लागत नाही. अशा सूर्यप्रकाशाचा वापर करून विद्युतनिर्मिती करणाऱ्या बॅटरींना ‘सौरघट’ म्हणतात. सूर्याची उष्णता, वाहते वारे, पाणी हे कधीही संपू शकत नाहीत. ते कायम आपल्यासाठी फुकट उपलब्ध असतात. यांच्यापासून वीजनिर्मिती केल्यास प्रदूषण होत नाही. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहचत नाही व पर्यावरणाचे नुकसान होत नाही. या सर्व गोष्टी फुकट मिळत असल्या तरी यांच्यापासून वीजनिर्माण करण्याच्या पद्धती खूप महाग आहेत. म्हणजेच, मुलांनो वीजनिर्मिती करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा वापर केला तरी पर्यावरणातील घटकांचा वापर व खर्च हा होतोच. त्यामुळे मुलांनो सर्व प्रकारच्या ऊर्जेचा वापर कमीत कमी प्रमाणात करण्याची सवय प्रत्येकाला होणे हे आजच्या जगात खूप गरजेचे आहे.